मे सत्रातील जेईई-मेन परीक्षा पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 24 ते 28 मेदरम्यान होणारी जेईई– मेन परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे,    अशी माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आज दिली. गेल्या एप्रिल सत्रातील जेईई-मेन परीक्षा यापूर्वीच पुढे ढकलली गेली होती. एप्रिल आणि मे सत्रातील जेईई परीक्षेचे नवे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असे एनटीएने सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहन पेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी ट्विटरवरून केले आहे.जेईईमेन परीक्षा यंदापासून दरवर्षी चार वेळा घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च सत्रातील परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या.