बटाटा आणि भेंडी हिंदुस्थानी भाज्या नाहीत! मग आपल्या ताटात आल्या तरी कुठून? वाचा

आपल्या हिंदूस्थानात आहारामध्ये बटाटा, टोमॅटो, भेंडी, मिरची यांच्याशिवाय अपुरं आहे. उत्तर हिंदुस्थानात आलू पराठा, दक्षिणेत टोमॅटो सांबार, पश्चिमेत भेंडी मसाला, पूर्वेत मिरचीचं लोणचं, या भाज्या आपल्या आहारामध्ये एक आगळीवेगळी चव देतात. पण तुम्हाला माहित आहे का, या भाज्या खरंच हिंदुस्थानी आहेत का? तर नाही! या सगळ्या परदेशातून हिंदुस्थानात आल्या आणि आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग बनल्या. या लेखात भाज्यांचा मूळ उगम आणि हिंदुस्थानातला प्रवास जाणून घेऊया

बटाटा


बटाटा हा सहसा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. पण बटाटा मूळचा दक्षिण अमेरिकेतला असून पेरू आणि बोलिव्हियात सात हजार वर्षांपासून बटाट्याची शेती केली जात आहे. हिंदुस्थानात सतराव्या शतकात पोर्तुगाल व्यापाऱ्यांनी बटाटा आणला. आज भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे.

टोमॅटो


आपल्या दैनंदिन आहारात टोमॅटो कायम वापरला जातो. मात्र टोमॅटो हा मूळचा मध्य आणि दक्षिण अमेरिकेतला आहे. मेक्सिकोत हजारो वर्षांपासून टोमॅटोची लागवड केली जाते. सतराव्या शतकात पोर्तुगाली लोकांनी टोमॅटो हिंदुस्थानात आणला आहे. सुरुवातीला लोक याला विषारी समजायचे. त्याला “लव्ह अ‍ॅपल” म्हणायचे. पण अठराव्या शतकापासून टोमॅटो हिंदुस्थानीयांच्या स्वयंपाकात रुजला.

 

 

 

भेंडी


मसाला भेंडी किंवा भरली भेंडी अनेकांचा जीव की प्राण आहे. पण भेंडी मूळची पूर्व आफ्रिकेतली आणि इथिओपियातली आहे. चार हजार वर्षांपासून तिथे भेंडी ची शेती केली जाते. बाराव्या शतकात बंटू जमातींमार्फत भेंडी हिंदुस्थानात आली, असं मानले जाते की, भेंडीमध्ये असलेल्या पौष्टिक गुणामुळे ती खास आहे. हिंदुस्थान आज जगात सर्वात जास्त भेंडी पिकवणारा देश आहे.

मिरची


मिरची शिवाय हिंदुस्थानातील  जेवणाला चवच उरत नाही. पण मिरची मूळची मेक्सिकोतली आहे. सहा हजार वर्षांपासून तिथे मिरचीची शेती होत होती. पंधराव्या शतकाच्या शेवटी पोर्तुगाली व्यापारी वास्को द गामाने मिरची हिंदुस्थानात आणली. त्याआधी आपण काळी मिरी आणि आल्याचा वापर करत होतो. मिरचीमुळे हिंदुस्थानातील पदार्थांना तिखट चव मिळाली. आज हिंदुस्थान जगात सर्वात जास्त मिरची पिकवतो आणि परदेशात निर्यात देखील करतो.

फरसबी


फरसबी गेल्या काही वर्षांत आपल्या हिंदुस्थानातील स्वयंपाकात रुळलेली आहे. पण फरसबी मूळची मध्य आणि दक्षिण अमेरिकेतली आहे. पाच हजार वर्षांपासून तिथे फरसबी उगवत होती. सतराव्या शतकात पोर्तुगाली आणि स्पॅनिश व्यापाऱ्यांनी फरसबी हिंदुस्थानात आणली. याच्या कुरकुरीत चवीमुळे आणि पौष्टिकतेमुळे ती लोकप्रिय झाली.

फूल गोबी


आलू फूल गोबी-फूल गोबी, फूल गोबी मंचुरियनसारखे पदार्थ आता सगळ्यांना आवडतात. मात्र फूल गोबी ही मूळची भूमध्य सागरातली भाजी आहे. 1820 च्या सुमारास ब्रिटिशांनी ती हिंदुस्थानात आणली.