मालवणात रस्त्यावर पडले भगदाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।मालवण

मालवण शहरातील माघी गणेश मंदिर मार्गावरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी भगदाड पडले. दरम्यान सुमारे दोन फुटापेक्षा जास्त खोलीच्या या खड्डयांमुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता  वाहनचालकांनी याची माहिती तत्काळ नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. त्यांनी तत्काळ पालिका कर्मचारी व कामगारांना पाठवत भगदाड बुजवण्याची कार्यवाही केली.

मुख्य रस्त्यावरून वाहनांची येजा अधिक असते. त्यात पडलेले भगदाड रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघाताची भीती अधिक होती. तर पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन त्याच मार्गावरून असल्याने नगराध्यक्ष यांनी तात्काळ कार्यवाही केली. मात्र मोठ्या खोलीचे भगदाड रस्त्यावर पडले कसे याची उलट सुलट चर्चा सुरू होती. भुयारी गटारची पाईपलाईन खोदलेल्या ठिकाणी भगदाड पडल्याने त्या कामाबाबतही प्रश्न उपस्थित होत होते.