अनुष्कासोबतच्या नात्याबाबत प्रभासचे मोठे वक्तव्य… वाचा काय म्हणाला तो

1396

बाहुबली चित्रपट रिलीज झाला व त्यानंतर अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेयरच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ते एकत्र आल्याचे बोलले गेले. सततच्या या अफेयरच्या चर्चांवर अखेर प्रभासने मौन सोडले आहे. ‘अनुष्का व माझे जर अफेयर असते तर तुम्ही गेल्या दोन वर्षात आम्हाला एकदा तरी एकत्र फिरताना पाहिले असेल’, असे प्रभासने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

‘अनुष्का आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आमच्यात तसे काहीच नाही. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या शो मध्ये देखील मला याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी मी राणा आणि राजमाऊली यांना उत्तर देण्यास सांगितलेले व त्यांनी देखील आमच्या दोघांमध्ये काहीच नसल्याचे सांगितलेले. जर आमच्यात काही असते तर तुम्ही गेल्या दोन वर्षात आम्हाला एकत्र फिरताना पाहिले नसते का? असा सवाल प्रभासने यावेळी केला आहे.

प्रभास व अनुष्काच्या अफेयरच्या चर्चा या गेल्या दोन वर्षांपासून रंगत आहेत. मध्यंतर ते दोघे लॉस एंजलिसमध्ये घर घेत असल्याचे देखील बोलले जात होते. त्यानंतर ते जपानला एकत्र फिरायला गेल्याच्या देखील चर्चा होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या