प्रभादेवीत महिला उद्योजिका, बचत गटांचे प्रदर्शन

मातोश्री महिला प्रतिष्ठानने मुंबईतील महिला उद्योजिका आणि महिला बचत गटांचे गुढीपाडवा विशेष भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 17 ते 19 मार्चदरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन प्रभादेवी येथील बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅपॅडमी, मराठा उद्योग भवनच्या मागे भरणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

गुढीपाडव्यानिमित्त खास महिलांसाठी विविध प्रकारचे ड्रेस मेटेरियल, साडय़ा ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या व गृह उपयोगी वस्तू या प्रदर्शनात असणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळी, विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले, असे मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या सचिव रंजना नेवाळकर यांनी स्पष्ट केले.