प्रभासच्या सिनेमाचा सेट कोरोनाग्रस्तांसाठी, ‘राधे श्याम’च्या निर्मात्यांचा कौतुकास्पद निर्णय

देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले आहे. रुग्णांना ऑक्सिजन, बेड्ससह अन्य वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासत आहे. अशा वेळी प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटातील निर्मात्यांनी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. कोटय़वधी रुपये खर्चून उभारलेल्या चित्रपटाच्या सेटवरची संपूर्ण प्रॉपर्टी हैदराबादमधील एका खासगी कोविड रुग्णालयाला दान दिली आहे.

प्रभास आणि पूजा हेगडे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘राधे श्याम’ या चित्रपटासाठी इटलीतील 70च्या दशकातील एका रुग्णालयाचा भव्यदिव्य सेट तयार केला होता. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर हे सामान एका गोदामात ठेवले होते. सध्या कोरोनाग्रस्तांना बेड्स आणि अन्य वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासत असल्याने हे साहित्य निर्मात्यांनी हैदराबादमधील एका रुग्णालयाला दिले आहे. या सेटवर 50 बेड्स, स्ट्रेचर, पीपीई कीट, ऑक्सिजन सिलिंडर्स आदी सामान होते. तब्बल नऊ ट्रक भरून हे वैद्यकीय साहित्य खासगी रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या