
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि ‘हनी ट्रप’ प्रकरणी मुंबई पोलिसांच्याअटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढा याला मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
प्रफुल्ल लोढा (62) जामनेर, जळगाव असे या आरोपीचे नाव आहे. बावधन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाया 36 वर्षीय महिलेने 17 जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी लोढा याने फिर्यादी यांना तुमच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून त्यांना 27 मे 2025 रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावून दिशाभूल करत शरीरसंबंध ठेवले होते.