प्रज्ञानंदा वर्ल्ड टॉप टेनमध्ये; पाचव्या फेरीत फॅबियानो कारूआनाला हरविले

अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनला हरविणारा हिंदुस्थानचा 18 वर्षीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदाने पाचव्या फेरीत द्वितीय मानांकित फॅबियानो कारूआनाचा पराभव केला. या विजयासह प्रज्ञानंदाने जागतिक क्रमवारीत टॉप-10मध्ये स्थान मिळविले.

आर. प्रज्ञानंदाने बुधवारी तिसऱया फेरीत यजमान देशाच्या मॅग्नस कार्लसनवर क्लासिकल चेसमध्ये कारकीर्दीत पहिल्यांदा विजय मिळवित इतिहास घडविला होता, मात्र चौथ्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने प्रज्ञानंदाचा विजयरथ रोखला. नाकामुरा गुणतक्त्यात अव्वल स्थानी असून कार्लसन दुसऱया क्रमांकावर आहे. आर. प्रज्ञानंदा हा  पाच लढतींत दोन विजय, एक पराभव व दोन ड्रॉसह 8.5 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.

वैशाली अव्वल स्थानी कायम

आर. प्रज्ञानंदाची बहीण आर. वैशाली हिनेल चीनच्या लेई टिंगजी हिला आर्मागेडन (सडन डेथ) पद्धतीने चेकमेट करीत विजय मिळविला. हिंदुस्थानची ही खेळाडू पाच फेऱयांनंतर दोन विजय व तीन ड्रॉसह सर्वाधिक दहा गुणांसह अव्वल स्थानावरकायम आहे.