शिवसेना आमदारांचे रिपोर्ट कार्ड अव्वल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मुंबईतील शिवसेना आमदारांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड अव्वल असल्याचे ‘प्रजा’ फाऊंडेशनच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकूण 32 आमदारांच्या यादीत शिवसेनेच्या सर्वाधिक 13 आमदारांचा समावेश या रिपोर्ट कार्डमध्ये आहे. यामध्ये काँग्रेसचे अमिन पटेल अव्वल स्थानी तर शिवसेनेचे सुनील प्रभू दुसऱ्या आणि भाजपचे अतुल भातखळकर तिसऱ्या स्थानावर आहेत.

‘प्रजा’ फाऊंडेशनने प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदारांच्या कामगिरीच्या सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला. यामध्ये जाहीर केलेल्या 32 आमदारांच्या यादीत शिवसेनेचे सर्वाधिक 13, भाजपचे 12, काँग्रेस – 5, एमआयएम आणि सपाच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. या अहवालात शिवसेना आमदार सुनील शिंदे, तृप्ती सावंत, प्रकाश फातर्पेकर, अजय चौधरी, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, तुकाराम काते, सुनील राऊत, रमेश लटके, अशोक पाटील, सदानंद सरवणकर आणि संजय पोतनीस यांचा समावेश आहे. विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या आमदारांचे कार्य जनतेला समजावे या उद्देशाने सर्वेक्षण आणि कामगिरीच्या आढाव्यावरून अहवाल प्रसिद्ध केल्याचे ‘प्रजा’चे संस्थापक नितीन मेहता, संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.

असा आहे अहवाल

  • शिवसेना आणि भाजप आमदारांची सरासरी गुणसंख्या 58 टक्के इतकी आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रकादी काँग्रेस यांची गुणसंख्या 62 टक्के इतकी आहे.
  • विधानसभा सभागृहात मुंबईमधील आमदारांच्या उपस्थितीत 10 टक्के घट.
  • विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्याही खालाकली.
  • 24 हजार 290 लोकांमध्ये सर्क्हे घेण्यात आला.
  • आमदारांवर दाखल गुह्यांमध्येही काढ झालेली आहे. 2017 मध्ये 13 आमदारांकर गुन्हे नोंदकण्यात आले म्हणजे 36 टक्के तर 2018 मध्ये ही संख्या काढून 44 टक्के म्हणजे 16 आमदारांकर गुन्हे नोंदकले गेलेत.