
आंतरराष्ट्रीय बीच एशियन रस्सीखेच स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जायगाव (ता. सिन्नर) येथील खेळाडू प्रणव किशोर दिघोळे याने सुवर्ण व कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात मलेशियामध्ये ही स्पर्धा पार पडली.
प्रणवने 23 वर्षांखालील गटात कुवैतविरुद्ध सुवर्ण आणि 23 वर्षांखालील गटात मिक्स 4 बाय 4 गटात कांस्य पदक जिंकले. या यशाबद्दल असोसिएशनच्या अध्यक्षा माधवी पाटील, संजय पाटील, स्वप्नील करपे, विनोद शिरभाते, सुरेखा पाटील आदींनी प्रणवचे अभिनंदन केले. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल केल्याने त्याचे महाराष्ट्रासह देशभरात कौतुक होत आहे.





























































