‘वंदे मातरम’ला विरोध करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकारी नाही! – प्रतापचंद्र सारंगी

551

लोकसभा निवडणुकीवेळा सायकलवरून प्रचार करणारे आणि निवडून आल्यानंतर थेट केंद्रीय मंत्रीपदावर निवड झालेले प्रताप चंद्र सारंगी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्यापासून सरकार विरोधात बोलणाऱ्या काँग्रेसवर सारंगी यांनी निशाणा साधला. भाजपला विरोध असणाऱ्या अनेक पक्षांनी या निर्णयाचे समर्थन केले, परंतु काँग्रेसने याचा विरोध केला. यानंतर अमित शहा यांनी पीओके आणि अक्साई चीनही हिंदुस्थानचे असल्याचे म्हटले, असे सारंगी म्हणाले. तसेच जे लोक वंद मातरमचा स्वीकार करत नाही, त्यांना देशामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम रद्दबातल झाल्यानंतर तुकडे-तुकडे गँग आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांना सर्वाधिक दु:ख झाले. संपूर्ण विश्व हिंदुस्थानच्या निर्णयाची प्रशंसा करत असताना काही लोक सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पद्धतीवर बोट उचलू लागले. तसेच ते पुढे म्हणाले की, काही लोक मानवाधिकाराच्या बाता करतात, परंतु कश्मीरमध्ये तैनात जवानांच्या हत्या करण्यात आल्या होत्या तेव्हा ही लोक कुठे होती, असा सवाल सारंगी यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या