बोरीवलीत भरणार प्रतिमा छायाचित्र प्रदर्शन

51

सामना ऑनलाईन । मुंबई

बेबी स्टेप क्रियेशन प्रस्तुत सलग ५ वर्षांत होणारे ७ वे प्रतिमा छायाचित्र प्रदर्शन या वर्षी २३, २४ व २५ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. यंदा देखील प्रदर्शनासोबत स्पर्धेचेही आयोजन केले गेले आहे; ज्यामधे निवडक १०१ छायाचित्रे कलादालनात प्रदर्शित केली जातील आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसांसोबत स्मृतिचिन्ह तसेच सन्मानपत्राने पुरस्कृत केले जाईल. तसेच Viewers Choice म्हणून एक फोटो आणि प्रत्येक कॅटेगरीमधील सर्वोत्कृष्ठ फोटोजना देखील पारितोषिके दिली जातील.

बेबी स्टेप क्रियेशनद्वारे उदयोन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन व व्यवस्थापन करण्यात येते. सद्यस्थितीत, प्रतिमा छायाचित्र प्रदर्शन, प्रतिमा फोटोवॉक, शैलराज ट्रेकर्स- गड दर्शन, निसर्ग सहल, पॅकेज टुर्स तसेच समाजोपयोगी विषयांवरील चर्चासत्रे यासारखे निरनिराळे उपक्रम बेबी स्टेप क्रियेशन तर्फे नियमितपणे राबविले जातात.

या स्पर्धेसाठी प्रवेश देण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर २०१८ असेल. ट्रॅव्हल/ लँडस्केप, मोनोक्रोम, वाइल्डलाइफ, मॅक्रो, स्ट्रीट/ पोर्ट्रेट या कॅटेगरीज मधली छायाचित्रे स्पर्धेसाठी दिली जाऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारी सर्व माहिती तसेच स्पर्धेचे नियम फेसबुक वरील Baby Step Creation या पेजवर उपलब्ध आहेत. अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क- ८६९२०८८३२९/ ८६९२०८८५२९

आपली प्रतिक्रिया द्या