प्रेमानंद गज्वी, माया जाधव यांना ‘मृद्गंध’, विठ्ठल उमप फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, लोककलावंत-नृत्यांगना माया जाधव, अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह सहा जणांना विठ्ठल उमप फाऊंडेशनचा मृद्गंध पुरस्कार जाहीर झाला आहे.

लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे मृद्गंध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन होते. सामाजिक, सांस्पृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी साहित्य व नाटक क्षेत्राचा पुरस्कार प्रेमानंद गज्वी, अभिनयासाठी प्रशांत दामले, संगीत क्षेत्रासाठी अशोक वायंगणकर, युथ आयका@न म्हणून प्राजक्ता कोळी आणि सामाजिक क्षेत्रासाठी रविंद्र बिरारी यांना पुरस्कार घोषित झाला आहे. लोककलेतील योगदानासाठी माया जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाईल.

कोरोना संकटामुळे यावर्षी मृद्गंध पुरस्कारांची फक्त घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्काराचे वितरण पुढच्या वर्षीच्या पुरस्कारांसोबत होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या