जम्मू-कश्मीरमधील बदलाचा जनतेला मोठा फायदा होईल – राष्ट्रपती

487

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाबाबत बोलताना म्हटले की, या बदलामध्ये तेथील जनतेचा मोठा फायदा होईल. कश्मीरमधील जनतेला यापूर्वी संपूर्ण देशात ज्या प्रमाणे नागरिकांना कुठेही मुक्तपणे जाण्याचा, समान हक्कांचा, समान सुविधांचा अधिकार आहे तो नव्हता. नव्या पुनर्रचनेमुळे जनतेला तो अधिकार आता मिळेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

राष्ट्रपती आपल्या भाषणात पुढे म्हणाले, हिंदुस्थान हा तरुणांचा देश आहे. खेळापासून ते तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तरुण आपल्या कौशल्याच्या बळावर चांगली कामगिरी करत आहेत.

लोकांच्या जनादेशातून त्यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट दिसत आहे. ते पूर्ण करण्यात सरकार आपली भूमिका निभावत असते. 130 कोटींच्या या देशातील नागरिक आपल्या कौशल्य, प्रतिभा आणि सर्जनशिलतेच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर देशात विकासाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकता, असे मला वाटत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

दोन्ही सभागृहाचे अभिनंदन
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कौतुक केले. दोन्ही सभागृहातील कामकाज उत्तम झाले आणि संसदेतील बैठकांमध्ये चांगले निर्णय झाल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या