राष्ट्रपती पोलीस पदकात महाराष्ट्राचा दबदबा, राज्यातील 43 पोलिसांचा सन्मान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. देशातील पोलिसांना पदके जाहीर झाली असून त्यात महाराष्ट्रातील 43 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, कोकण रेंजचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, नाशिक रेंजचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, सहाय्यक आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या कर्तृत्वाचा गौरव झाला आहे.

गुणवत्तापूर्व सेवेसाठी पदक

विशेष पोलीस महानिरीक्षक- संजय दराडे, वीरेंद्र मिश्रा, आरती सिंग, चंद्रकिशोर मीना, उपमहानिरीक्षक – दीपक साकोरे, अधीक्षक – राजेश बनसोडे, सुनील तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त – ममता डिसोझा, धर्मपाल बनसोडे यासह अन्य अधिकारी, कर्मचारी अशा 39 जणांना पदक जाहीर झाले आहे.

उल्लेखनीय कामगिरीसाठी पदक

अपर पोलीस महासंचालक – रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक – दत्तात्रय कराळे, सुनील फुलारी, कमाडंट – रामचंद्र पेंडे.