परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, प्रज्ञा ठाकूर यांचा राहुल गांधींना टोला

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांने नेहमी चर्चेत राहणाऱया भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी नवीन वाद ओढावून घेतला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

चाणक्य यांनी फक्त भुमिपुत्रच आपल्या मातृभूमीचे रक्षण करु शकतो असे सांगितले होते, असेही त्या म्हणाल्या आहेत. भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठकीत त्यांनी वरील वक्तव्य केले आहे. तर यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

आपली प्रतिक्रिया द्या