केरळमध्ये ब्रॉयलर चिकनच्या किमतीत अचानक घसरण झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी 160 रुपये प्रति किलोने विकल्या जाणाऱ्या ब्रॉयलर चिकनच्या किमती अचानक घसरल्या. एर्नाकुलममध्ये काही किरकोळ विक्रेते 120 रुपये, तर काही सुपरमार्केटमध्ये 99 रुपये प्रति किलो ब्रॉयलर चिकन विकत होते. किमती घसरल्याने पोल्ट्रीफॉम शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.