
डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई मागील महिन्याच्या तुलनेत वाढून 1.33 टक्क्याच्या पातळीवर पोहोचली आहे. ही तीन महिन्यांतील उच्च पातळी आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये ती 0.71 टक्के होती, जी 14 वर्षांतील सर्वात कमी पातळी होती. डिसेंबरमध्ये महागाई वाढण्याचे कारण डाळी, भाज्या, मांस-मासे, अंडी आणि विजेच्या दरात वाढ हे आहे. सरकारने सोमवारी महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे.
महागाई वाढणे -कमी होणे हे उत्पादनाच्या मागणी आणि पुरवठय़ावर अवलंबून असते. जर लोकांकडे जास्त पैसे असतील तर ते जास्त वस्तू खरेदी करतील. जास्त वस्तू खरेदी केल्याने वस्तूंची मागणी वाढेल आणि मागणीनुसार पुरवठा न झाल्यास या वस्तूंची किंमत वाढेल. जर मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त असेल तर महागाई कमी होईल.
नोव्हेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या
महागाईच्या बास्केटमध्ये जवळपास 50 टक्के योगदान खाण्यापिण्याच्या वस्तूंचे असते. याची महिना-दर-महिना महागाई उणे 3.91 टक्क्यांवरून वाढून उणे 2.71 टक्के झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात ग्रामीण महागाई दर 0.10 टक्क्यावरून वाढून 0.76 टक्के झाला आहे, तर शहरी महागाई 1.40टक्क्यावरून वाढून 2.03 टक्के झाली आहे.





























































