मालदीवला 4,850 कोटींचे कर्ज देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

‘मालदीव हा हिंदुस्थानचा खरा मित्र असून दोन्ही देशांतील सहकार्य आणखी बळकट व्हावे अशी आमची इच्छा आहे,’ असे सांगतानाच मालदीवला 4,850 कोटींचे कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मालदीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांच्यासह विविध नेत्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. ‘हिंदुस्थान व मालदीव पायाभूत सेवासुविधा, तंत्रज्ञान, पर्यावरण, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत एकत्र काम करत आहेत. दोन्ही देशांना याचा लाभ होत आहे. येत्या काळात हे सहकार्य आणखी वृद्धिंगत व्हावे अशी इच्छा आहे,’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.