एक अकेला सब पे भारी, पंतप्रधान आता ब्रुनेईच्या दौऱ्यावर; मोदींची विदेश दौऱ्याची हॅट्ट्रिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व आशियाई देश ब्रुनेईच्या दौऱयावर रवाना झाले. मोदी यांचा हा विदेश दौरा दोन दिवसांचा आहे. ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून मोदी भेट देत आहेत. ब्रुनेई दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी 4 आणि 5 सप्टेंबरला सिंगापूरला भेट देणार आहेत. यादरम्यान ते सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. मोदी सिंगापूरमधील व्यावसायिक नेत्यांचीही भेट घेणार आहेत. 10 वर्षे सत्तेत असताना वेगवेगळ्या विदेश दौऱयांवर जाणाऱया मोदी यांनी आता ‘एनडीए’च्या पाठिंब्यावर तिसऱयांदा सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा विदेश दौरे सुरू केले आहेत. सर्वात आधी इटलीचा दौरा केल्यानंतर मोदींनी 8 आणि 9 जुलैला रशियाचा दौरा केला. या दौऱयांनंतर मोदी यांनी व्हिएन्नाचा दौरा केला. याआधी नुकताच त्यांनी युक्रेनचा दौरा केला.

2024 मधील दौरे
– इटली – 13 ते 14 जून
– रशिया-ऑस्ट्रिया – 8 ते 10 जुलै
– पोलंड आणि युक्रेन – 21 ते 23 ऑगस्ट
– ब्रुनेई आणि सिंगापूर – 3 ते 5 सप्टेंबर
– भूतान – 22 ते 23 मार्च
– संयुक्त अरब अमिरात आणि कतार – 13 ते 15 फेब्रुवारी
– मोदी यांनी 2014 ते 2019 या काळात 57 देशांचे एकूण 92 दौरे केले, तर 2019 ते 2024 पर्यंत 28 देशांचे एकूण 43 दौरे केले. पंतप्रधान मोदी हे सर्वात जास्त 8 वेळा अमेरिका दौऱयावर गेले. मोदींनी दोन कार्यकाळात एकूण 135 दौरे केले.