राहुल यांची गळाभेट आणि ‘आँखो की गुस्ताखिया’वर मोदींचा निशाणा

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील शेवटचे भाषण केले. या भाषणात मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संसदेतील ‘कलाकारी’वर निशाणा साधला.

संसदेमध्ये मी पहिल्यांदा आलो आणि येथे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मला पहिल्यांदाच गळाभेट आणि गळ्यात पडण्यामधील अंतर संसदेत कळाले. तसेच संसदेमध्ये पहिल्यांदाच ‘आँखो की गुस्ताखिया’ पाहण्याची संधी मिळाली, असे म्हणत मोदींनी राहुल गांधी यांना टोला लगावला.

याआधी संसदेमध्ये राफेल करारावर संरक्षणमंत्री निर्मला सितारामन उत्तर देत असताना राहुल गांधी डोळे मारत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. तसेच जुलै, 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी डोळा मारला होता. राहुल यांच्या डोळ्यांच्या कलाकारीवर भाजपने कडाडून हल्ला चढवला होता. राहुल गांधी यांना महिलांच्या आणि संसदेच्या सन्मानाची काहीच चिंता नाही असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या