
इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या निर्माण झालेली परिस्थिती व संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. आचारसंहितेमुळे पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री बैठकीला नसतील.

























































