प्रिन्स हॅरी ‘बर्गर किंग’ची ऑफर स्वीकारणार?

1175

ब्रिटनचा राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल हे राजघराण्यापासून विभक्त झाले आहेत. त्यांनी आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला असून आता ते आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी होणार आहेत. त्यामुळे प्रिन्स हॅरीला जगातील प्रसिद्ध बर्गर किंग
या कंपनीने जॉब ऑफर केला आहे. बर्गर किंग या कंपनीच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. मात्र यात त्यांनी प्रिन्स हॅऱीचे नावे घेतलेले नाही

हॅरी आणि मर्केल यांनीव गेल्या बुधवारी अचानक राजघराण्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांची समजूत काढण्यासाठी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी राजघराण्यातील व्यक्तींची सोमवारी एक आपात्कालीन बैठक बोलावलीब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी राजघराण्यातील व्यक्तींची सोमवारी एक आपात्कालीन बैठक बोलावली होती. राणीच्या सैंड्रिघम इस्टेट या निवासीस्थानी झालेल्या बैठकीला राजपुत्र हॅरी, त्याचा भाऊ विल्यम आणि त्यांचे वडील चार्ल्स उपस्थित राहिले होते. मात्र या बैठकित कोणताही तोडगा निघाला नाही. तर हॅरी व मेगन हे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.

प्रिन्स हॅरी विभक्त झाल्यानंतर आता तो कुठे नोकरी करेल याबाबत सध्या ब्रिटनमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचवेळी बर्गर किंगने केलेल्या या ट्विटने धम्माल उडवली आहे. ‘इथे शाही कुटुंब पार्ट टाईम जॉब देते’ असे ट्विट बर्गर किंगने केले आहे. त्यांच्या या मजेशीर ट्विटवर नेटकऱी खूष झाले असून त्यांनी देखील मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या