
ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिडलटन आता सहकुटुंब फॉरेस्ट लॉजमध्ये जायची तयारी करत आहेत. हे घर बर्पशायरच्या विंडसर ग्रेट पार्पमध्ये आहे. 328 वर्षे जुनी अशी ही वास्तू आहे. तिची किंमत सुमारे 16 कोटी पाऊंड म्हणजेच 1600 कोटी रुपये आहे. मोठय़ा खिडक्या, संगमरवरी फायरप्लेस आणि सुंदर नक्षीकाम केलेले छत अशी त्याची खासीयत आहे. घरात एकदम आलिशान अशा आठ मोठय़ा खोल्या आहेत. या नवीन घरात शिफ्ट होण्यासाठी त्यात काही बदल करण्यात येणार आहेत.