शतक अन् विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
7. पृथ्वी शॉ (हिंदुस्थान ) - 18 वर्षं 329 दिवस - वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट कसोटी

सामना ऑनलाईन,राजकोट

मुंबईच्या 18 वर्षीय पृथ्वी शॉने राजकोट येथील पदार्पणाच्या कसोटीत धडाकेबाज शतकी खेळी केली. पृथ्वी शॉच्या झंझावातात गुरुवारी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. या संस्मरणीय खेळीने अनेक विक्रमांना गवसणी घातली. या विक्रमांवर टाकलेला दृष्टिक्षेप.

आकडय़ांचा खेळ

  • पृथ्वीने 99 चेंडूंत शतक झळकावले. पहिल्याच कसोटीत कमीत कमी चेंडूंत शतक झळकावणारा तो तिसराच फलंदाज ठरलाय. याआधी शिखर धवनने 85 आणि ड्वेन स्मिथने 93 चेंडूंत शतक झळकावले होते.
  • पृथ्वी शॉने 18 वर्षे व 329 दिवसांचा असताना पहिले कसोटी शतक झळकावले. याआधी मोहम्मद अश्रफुल, हॅमिल्टन मासाकाद्झा व सलीम मलिक यांनी त्याच्यापेक्षा कमी वयामध्ये ही करामत केलीय.
  • रणजी, दुलीप व कसोटीच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ हिंदुस्थानचा पहिलाच खेळाडू ठरलाय.
  • सर्वात कमी वयामध्ये कसोटी शतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा सचिन तेंडुलकरनंतर दुसराच हिंदुस्थानी खेळाडू ठरलाय. याआधी सचिन तेंडुलकरने 17 वर्षे 107 दिवस असताना कसोटीत शतक झळकावले होते.
  •  मायदेशात खेळताना पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा नववा खेळाडू ठरलाय.
  •  100 पेक्षा कमी चेंडूंवर शतक झळकावण्याची हिंदुस्थानची ही 18 वी खेप ठरलीय.
  •  कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ 15 वा हिंदुस्थानी फलंदाज ठरलाय.