पृथ्वी शॉ व मयांक अगरवाल या सलामीच्या जोडीचा ‘असाही’ विक्रम

737

टीम इंडियाकडून न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पृथ्वी शॉ व मयांक अगरवाल या नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली. टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी या दोघांनाही सलामीला उतरविण्यात आले. फलंदाजीत फार काही कमाल दाखवू शकले नसले तरी या दोघांनी एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावे करून घेतला आहे.

पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणारे दोन खेळाडू सलामीला उतरविण्याची टीम इंडियाची ही चौथी वेळ होती. याआधी सर्वात पहिल्यांदा 1974 मध्ये सुनील गावस्कर व सुधीर नाईक या नवोदित खेळाडूंना सलामीला येण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे पहिल्या क्रमांकावर या जोडीचे नाव येते. त्यानंतर असा विक्रम 1976 मध्ये पार्थासारथी शर्मा व दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर नोंद झाला होता. त्यानंतर तब्बल तीस वर्षांनी 2016 मध्ये के.एल राहुल व करुण नायर हे झिम्बाब्वे विरोधात सलामीला उतरले होते. आजच्या सामन्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉ व मयांक अगरवालला ही संधी देण्यात आली होती. त्या संधीचे ते चीज करू शकले नाही मात्र त्यांच्या नावावर हा विक्रम नोंद झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या