पंतप्रधान मोदी हिंसेच्या बाजूने आहेत की अहिंसेच्या – प्रियंका गांधी

267

जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून काँग्रेसने शुक्रवारी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंसेच्या बाजूने उभे आहेत की अहिंसेच्या बाजूने, असा सवाल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला, तर पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जामियाबाहेरील बंदुकधारी तरुणाला पैसे कोणी दिले, असा प्रश्न उपस्थित केला.

जामिया विद्यापीठाच्या आवारात गुरुवारी बंदुकधारी तरुणाने सीएएविरोधी आंदोलकांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या भयंकर घटनेवरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकारचे मंत्री आणि पक्षाचे नेते ज्यावेळी लोकांना गोळ्या झाडण्यास भडकावतात, भडकावू भाषणे देतात, त्यावेळीच या सर्व गोष्ट शक्य होतात, असा आरोप प्रियंका यांनी केला. दुसरीकडे राहुल गांधी यांनी जामियातील हल्लेखोराला पैसे कोणी दिले, असा प्रश्न उपस्थित केला.

आपली प्रतिक्रिया द्या