‘फोर्ब्स’च्या यादीत प्रियांका, दीपिका नाही

437

जगात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची नावे ‘फोर्ब्स’ने जाहीर केली असून त्यात हॉलीवूड अभिनेत्री स्कारलेट जोनासन हिने बाजी मारली आहे तर बॉलीवूडच्या प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांना यादीत स्थान मिळालेले नाही.

हॉलीवूडची अभिनेत्री स्कारलेट जोनासन ही 2018 मध्येही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री होती. तिने या वर्षीही सर्वाधिक कमाई केली आहे. आगामी ‘ब्लॅक विंडो’ चित्रपटातील या अभिनेत्रीने 2019मध्ये तब्बल 400 कोटींची कमाई केली आहे. ‘द मॉडर्न फॅमिली स्टार’ सोफिया वर्गेरा हिने 44.1 मिलियन अमेरिकन डॉलर्स कमावले असून ती दुसऱया क्रमांकावर आहे. रीस विदर्सस्पुंटो ही तिसऱया, निकोल किडमन चौथ्या तर जेनिफर अनिस्टन ही पाचव्या नंबरवर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या