प्रियंका यांचा विनाहेल्मेट प्रवास

338

 काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा स्कुटीचालक आमदार धीरज गुर्जर यांना वाहतूक विभागाने दुचाकीवर बसताना हेल्मेट न परिधान केल्याबद्दल 6100 रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रियंका गांधी शनिवारी निवृत्त पोलीस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. यावेळी प्रियंका गांधी आमदार गुर्जर यांच्या दुचाकीवरून प्रवास करत होत्या. आता वाहतूक विभागाने प्रियंका गांधी यांच्या आमदाराला दंड ठोठावल्याने वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या