क्वारंटाईन न होणे भोवले, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

2012
pune-police

परेदशातून आल्यानंतरही मुंबईमार्गे पुण्यात येऊन हॉटेलमध्ये क्वारंटाईन न होणाऱ्या महिलेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुजा महादेव हाके (रा. अलंकापुरी सोसायटी, पौड रस्ता, कोथरुड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र दुर्गाप्पा गायकवाड (वय 37, रा. वडगाव बुद्रूक) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजा मस्कत देशातून मुुंबईत आल्या होत्या. त्यानंतर अनुजा विमानाने पुण्यात दाखल झाल्या. परदेशातून आल्यानंतर त्यांनी मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणे आवश्यक होते. मात्र, त्या थेट कोथरुड परिसरातील घरी राहण्यास गेल्या. तत्पुर्वी त्यांना घरालगत असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होण्याची सूचना प्रशासनाने केली होती. मात्र, तरीही क्वारंटाईन न होता घरी राहिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या