
सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई
स्वा. रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजच्या अस्तिरोग विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. विजय बुरांडे सर यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे.
माजी खासदार कै. कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिरोग विभागात ते प्रमुख प्रोफेसर होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





























































