मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक राजन शिंदे यांची गळा चिरून निर्घृण हत्या

prof-rajan-shinde

संभाजीनगर शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहराच्या सिडको एन 2 भागात सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. डॉ. राजन शिंदे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

डॉ. राजन शिंदे हे मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. ते इंग्रजी विषय शिकवत. आज पहाटे त्यांच्या कुटुंबीयांना ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. घरातील कोणतीही वस्तू, पैसे चोरीला गेल्याचे अद्याप आढलेले नाही. त्यामुळे हत्ये मागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या