
महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात विविध वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची वर्दळ असते. विविध आरोग्य सुविधांसाठी पैसे भरण्यासाठी रोख तसेच डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले. एक्स-रे, एमआरआय, बाह्यरुग्ण विभागाचा केसपेपर व इतर वैद्यकीय सेवांचे शुल्क रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सध्या रोख स्वरूपात अदा करावे लागते. त्या ठिकाणी डिजिटल पेमेंट करण्यासाठी पीओएस (PoS) मशीन उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
























































