आम्हांला ‘ट्रान्सजेंडर’ म्हणून घोषित करुन टाका- पुदुचेरीच्या मुख्यमंत्र्यांचे संतप्त वक्तव्य

1342

केंद्र सरकार त्याच्या सोयीनुसार आमच्या राज्याकडे लक्ष देत आहे. यामुळे आम्ही ना इकडचे आहोत ना तिकडचे. म्हणूनच मी सरकारला सांगितलंय की आम्हांला एकदाचं ‘ट्रान्सजेंडर’ म्हणून घोषित करून टाका. असे धक्कादायक वक्तव्य पुदुचेरीचे मुख्यमंत्री वी.नारायणसामी यांनी केले.

वी.नारायणसामी एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नारायणसामी यांनी केंद्राला लक्ष्य केलं. दिल्ली आणि पुदुचेरी ही राज्य सध्या अडचणीत आहेत. कारण येथे विधानसभाही आहे आणि ते केंद्रशासित राज्येही आहेत. पण जेव्हा जीएसटी लागू करण्याचा मुद्दा येतो तेव्हा केंद्र सरकार आमच्याकडे एक राज्य म्हणून बघते आणि पैसा घेऊन जाते. पण ज्यावेळी निरनिराळ्या सरकारी योजना लागू करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आम्हाला केंद्र शासित राज्य म्हणून वागणूक दिली जाते. यामुळे आमची अवस्था म्हणजे ना इकडचे आहोत ना तिकडचे अशी झाली आहे. म्हणूनच मी सरकारला सांगितलंय की आम्हांला एकदाचं ‘ट्रान्सजेंडर’ म्हणून घोषित करून टाका. असं नारायणसामी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, नारायणसामी यांनी काही दिवसांपूर्वीच उपराज्यपाल किरण बेदी यांनाही लक्ष्य केलं होतं. गेल्या मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात त्यांनी किरण बेदी या हुकुमशहा सारखे काम करतात. त्या जर्मनचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या बहीण आहेत. मंत्रिमंडळाच्या प्रत्येक निर्णयात त्या अडचणी आणतात. जेव्हा आमच्या निर्णयांना त्या केराची टोपली दाखवतात. तेव्हा मात्र माझ रक्त उसळत असं नारायणसामी यांनी म्हटलं होत. त्यांच्या या वक्तव्यावरुनही खळबळ उडाली होती.

तसेच 8 नोव्हेंबरलाही नारायणसामी यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. केंद्राने त्यांच्या राज्यात एक दानव बसवला आहे. जो केंद्र शासनाकडून येणारा निधी मध्येच अडवण्याचा काम करत आहे. पुदुचेरीमध्ये नारायणसामी आणि उपराज्यपाल किरण बेदी यांच्यात वाद असून सतत त्यांच्यात कुरुबुरी सुरू असतात.

आपली प्रतिक्रिया द्या