
पत्रकारितेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘पुलित्झर’ पुरस्कारांची आज घोषणा झाली. यामध्ये ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने चार पुरस्कार पटकावले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न कॅमेऱयात टिपणारे ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे ज्येष्ठ पह्टोग्राफर डग मिल्स यांना पुरस्कार मिळाला. निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर झाडलेली गोळी त्यांच्या अगदी जवळून गेली होती. हा क्षण डग मिल्स यांनी कॅमेऱयात टिपला होता. याबद्दल डग मिल्स यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुलित्झरचा प्रतिष्ठत सार्वजनिक सेवा पदक सलग दुसऱया वर्षी ‘प्रोपब्लिका’ला मिळाला. कठोर गर्भपात कायदे असलेल्या राज्यांमध्ये डॉक्टरांनी तातडीची काळजी घेण्यास उशीर केल्याने मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलांबद्दल वृत्तांकन केल्याबद्दल कविता सुराणा, लिझी प्रेसर, पॅसँड्रा जारामिलो आणि स्टेसी व्रॅनिट्झ यांना सन्मानित करण्यात आले.
ट्रम्प हत्येच्या प्रयत्नाच्या ब्रेकिंग न्यूज कव्हरेजसाठी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला गौरवण्यात आले. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने ट्रम्प यांच्यावरील संपादकीय कार्टून चालवण्यास नकार दिल्यानंतर नोकरीचा राजीनामा देणाऱया अॅन टेलनेस यांच्या निर्भयतेचा ‘पुलित्झर्स’ने सन्मान करण्यात आला. अफगाणिस्तान, सुदान, बाल्टिमोर आणि बटलर, पेनसिल्व्हेनिया येथील वृत्तांकनासाठी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला पुरस्कार मिळाले. ‘द टाइम्स’चे आझम अहमद आणि क्रिस्टीना गोल्डबॉम आणि योगदान देणारे लेखक मॅथ्यू एकिन्स यांना अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या धोरणातील अपयशाचे विश्लेषण करणाऱया रिपोर्टलाही पुरस्कार मिळाले.