
पालिकेच्या माध्यमातून माहुल आणि मोगरा अशी दोन नवीन पंपिंग स्टेशन बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे अंधेरी, माहुल परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका होणार आहे. हे काम करण्यासाठी पालिका लवकरच सल्लागाराची नियुक्ती करणार आहे.
मुंबईची पाणी तुंबण्यातून सुटका करण्यासाठी आठ पंपिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यानंतर यातील सहा पंपिंग स्टेशन सुरू झाली आहेत. यातील उर्वरित मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशन लवकरच सुरू होणार आहेत. या कामासाठी पंपिंग स्टेशन बांधण्याकरिता नेमण्यात येणारा सल्लागार पंपिंग स्टेशनचे नियोजन, संकल्पचित्र, निकिदा तयार करणे, ना हरकत प्रमाणपत्र मिळकिणे आणि प्रकल्प क्यकस्थापन याबाबत सल्ला देणार आहे. यानंतर तातडीने या दोन्ही पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरुकात होईल.
आतापर्यंत सुरू झालेली पंपिंग स्टेशन व खर्च
हाजी अली – 100 कोटी
इर्ला – 90 कोटी
लक्हग्रोक्ह – 102 कोटी
क्लिक्हलँड बंदर – 116 कोटी
ब्रिटानिया – 120 कोटी
गझदरबंध – 125 कोटी


























































