
पुण्यातील विविध भागात विषारी दारू प्यायल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दापोडी फुगेवाडीतील 8 जणांचा तर काळे पडळ भागात 3 आणि हडपसरमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी योगेश वानखेडे या दारु विक्रेत्याला अटक केली आहे.
ही विषारी स्पिरिटयुक्त दारु योगेश वानखेडे याने उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तयार केली होती. योगेशने त्या दारुत 215 लीटर मिथेनॉल मिसळले. त्यानंतर ती दारू त्याने पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड शहरातील दारू गुत्त्यावर वितरीत केली. या आधी अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. त्याला पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दारूचे कॅन देखील जप्त केले आहेत.




























































