पुणे – वादातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या फरारीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेम्पो चालकासोबत झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करून त्यांच्या दाजीवर गोळीबार करणाऱ्या फरारी सुनील दिलीप झरे (वय 21) याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. मागील सहा महिन्यांपासून तो फरार होता.

वादातून सुनील गाडे या तरुणावर गोळीबार करणारा फरारी सुनील झरे (हांडेवाडी, हडपसर) परिसरात येणार असल्याची माहिती लोणी काळभोरचे पोलीस हवालदार नितीन गायकवाड आणि दिगंबर साळुंके यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून सुनीलला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, एपीआय राजू महानोर, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, प्रमोद गायकवाड, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे, बाजीराव वीर, निखील पवार, रोहिदास पारखे यांच्या पथकाने केली.