दोन दुचाकीच्या धडकेत तरुण ठार, तिघे जखमी

535
accident

भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत समोरील दुचाकीवरील तरुण ठार झाला. अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दोन दिवसांपूर्वी संध्यकाळी पावणेसहाच्या सुमारास पुणे-सोलापूर हर रस्त्यावरील मांजरी बुद्रूकजवळ घडला.

राजू रावसाहेब सावंत (वय 24, रा. शंकरमठ, हडपसर)  असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी  किरण जगताप यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय चंद्रकांत घाडगे (वय 21, रा. भवरावस्ती, फुरसुंगी ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राजू आणि किरण एका दुचाकीवर  रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या अजयने त्यांना धडक दिली. त्यामुळे राजू आणि किरण खाली पडले. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे राजूचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बेदरकारपणे दुचाकी चालविल्यामुळे अजयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात अजय घाडगे, किरण जगताप, सुदर्शन घाडगे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. डी. पाटील अधिक तपास करीत आहेत

विश्रांतवाडीत दुचाकी घसरून एक ठार

भरधाव वेगात दुचाकी चालवून घसरल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडीतील एअरपोर्ट रस्त्यावर घडला.  रवींद्र साधू जाधव (वय 41, रा. येरवडा ) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या