राहुरी शिर्डी रस्त्यावर विचित्र अपघात

515

राहुरी शिर्डी रस्त्यावर विचित्र अपघात झाला असून रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे शनिवारी मध्यरात्री तब्बल आठ वाहनं एकमेकांवर आदळली. पण सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही.

नगर मनमाड राज्य मार्गावरील गुहा कोल्हार खुर्द तालुका राहुरी या रस्त्यावर मध्यराञी अपघाताच्या लागोपाठ आठ घटना घडल्या. गुहा येथे रस्त्यावर ऑईल सांडल्याने शिर्डी तसेच राहुरी दिशेला जाणारी चारचाकी व मालवाहू वाहने घसरली व एकमेकांवर धडकली. मध्यरात्रीची वेळ असल्याने मोठा आरडाओरड झाला.परिसरातील शेतक-यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

शिर्डी कडुन नगर दिशेला चाललेली शिवशाही बस रस्त्यावर घसरून पलटी झाली. बस प्रवाशांनी भरलेली होती. माञ या अपघातात सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही. कोल्हार खुर्द येथे दोन कंटेनर एकमेकांवर धडकल्याने कंटेनर मध्ये दबलेल्या चालकाचा पाय मोडला आहे. या घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख,पोलीस उपनिरीक्षक यशवंत राक्षे,कॉन्स्टेबल लक्ष्मण खेडकर,सोमनाथ जायभाय यांनी अपघातातील वाहने हटविण्यासाठी तसेच जखमी कंटेनर चालकाला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी क्रेनला तसेच श्रीरामपुर येथील फायर फायटर वाहन व पथकाला घटनास्थळी पाचारण केले. ऑईल सांडलेला डांबरी रस्त्यावर फायर फायटर वाहनातुन प्रेशरने पाणी मारून हा रस्ता स्वच्छ करण्यात आला.

अपघात झालेले गुहा व कोल्हार खुर्द ही ठिकाणे देवळाली प्रवरा पासुन हाकेच्या अंतरावर आहे. तर राहुरी १५ किलोमीटर अंतरावर असताना रस्ता स्वच्छ करण्यासाठी या दोन्ही नगर परिषदेचे फायर फायटर वाहन मिळु शकले नाहीत. या उलट श्रीरामपुर अंतर दूर असताना देखील तेथील नगर परिषदेचे फायर फायटर पथक घटनास्थळी तात्काळ पोहचल्याने रस्ता स्वच्छ करण्याचे काम मार्गी लागले.

आपली प्रतिक्रिया द्या