
पीएमपीएल बसप्रवासात तिकीटावरून महिला कंडक्टरला ढकलून देणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केले. ही घटना 18 मार्चला संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास महानगरपालिका परिसरात घडली.
गोविंद शिवा अवतारे (वय 27) आणि जय रवी कांबळे (वय 22 रा. दळवीनगर, पिंपरी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी महिला पीएमपीएलमध्ये कंडक्टर पदावर कार्यरत आहेत.
18 मार्चला त्या महानगरपालिका ते निगडी बसमध्ये कार्यरत होत्या. त्यावेळी तिकीटावरून बसमधील गोविंद आणि जय यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली. त्याच वादातून दोघांनी कंडक्टर महिलेला ढकलून दिले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनिषा जाधव तपास करीत आहेत.




























































