पुणे – कुख्यात बंडू आंदेकरच्या आणखी दोन साथीदारांना अटक

तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरच्या आणखी दोन साथीदारांना खडक पोलिसांनी अटक केले आहे.

हितेंद्र विजय यादव (वय 32, रा. नानापेठ) आणि दानिश मुशीर शेख (वय 28, रा. नाना पेठ )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी याआधी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत ओंकार कुडले (वय 21) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास फिर्यादी ओंकार आणि त्याचा मित्र सूरज ठोंबरे कारणीभूत असल्याचा राग टोळीला होता. रागातून म्होरक्या बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी 21 फेब्रुवारीला ओंकारवर पालघन व कोयत्याने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, खडकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या