दुचाकी चोरणाऱ्या सराईत राक्याला अटक, विश्रामबाग पोलिसांनी जप्त केल्या दोन दुचाकी

crime

शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 75 हजारांच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राकेश उर्फ राक्या जॉनी सकट (वय 21 रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जया पंडित पाटील (रा. शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस शिपाई प्रशांत शिंदे आणि साताप्पा पाटील दुचाकीचा शोध घेत असताना सीसीटिव्ही फुटेजमधील आरोपी रेकॉर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सापळा रचून राकेश उर्फ राक्या याला ताब्यात घेतले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने, पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस उप निरीक्षक विष्णु देशमुख, संजय दगडे, शरद वाकसे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, सागर गोंजारी, प्रशांत पालांडे, साताप्पा पाटील, ज्ञानेश्वर पिंगळे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या