शेतातील रस्त्याच्या वादातून चुलत भावाचा केला खून; चौघे जेरबंद

645

शेतातील रस्त्यावरून झालेल्या वादात पौड येथील तव-मोसे गावात चौघांनी कोयत्याने चुलत भावाचा खून केल्याची घटना घडली. खुनानंतर पसार झालेल्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. भाऊ सामा मरगळे (वय 35) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश रामभाऊ मरगळे (वय 23), राजु ज्ञानोबा मरगळे (वय 19), विजय बाबुराव मरगळे (वय 22), सुनिल रामभाऊ मरगळे (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ मरगळे आणि आरोपी चुलत भाऊ आहेत. काही दिवसांपासून त्यांच्यात शेतातील रस्त्यावरून वाद सुरू होते. त्याच रागातून चौघांनी भाऊवर कोयत्याने वार करून खून केला. यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपी किरकीटवाडी करंजावणेवस्ती जवळील डोंगर माथ्यावर लपून बसले आहेत, अशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून त्यांचा पाठलाग करून चौघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या