तरूणाचे अपहरण करून दांडक्याने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणाचे दुचाकीवरून अपहरण करून त्याला दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. मारहाणीनंतर तरुणाला सोडून देण्यात आले. याप्रकरणी शुभम चीचोले आणि अनिकेत उर्फ चिरक्या थोरात याच्यासह साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्लाउद्दीन अब्दुल शेख याने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि त्याचा एक अल्पवयीन मित्र लोहगाव येथील कलवड वस्ती येथे बसले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी शेखला ‘अशफाक कुठे आहे. तुच अशफाकचा मित्र आहेस ना’ असे विचारून शेखला जबदरस्तीने त्यांच्या गाडीवर बसवून दुसऱ्या ठिकाणी नेले. गाडीवरून घेऊन जात असताना, आरोपींनी शेखच्या डोळ्यावर रुमाल बांधला होता. त्याशिवाय मदतीसाठी धावून आलेल्या मित्राला धमकी दिली. आरोपींनी शेखला वडगाव शेरी येथे नेऊन शिवगाळ करुन दांडक्याने मारहाण केली आहे.

तक्रार करणाऱ्याला दाम्पत्याकडून मारहाण

पुणे- सोसायटीतील काही गोष्टींबाबत महापालिका आयुक्त आणि सहकार आयुक्तांकडे तक्रार केल्याचा राग आल्यामुळे दाम्पत्याने एका रहिवाशाला मारहाण केल्याची घटना केशवनगर येथील साईनगरीमध्ये घडली. निलेश वायकर आणि वृषाली वायकर यांच्यावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अल्बर्ट मरियान कुरीस यांनी फिर्याद दिली आहे.