पुणे – खंडणी विरोधी पथकाकडून चरस विक्रेत्याला अटक

चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून 2 लाख 68 हजारांचे 36 ग्रॅम चरस आणि दुचाकी असा 3 लाख 18 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. शहादाब सलीम खान (वय 34 रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

खंडणी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आझादनगर चौकातील कमानीजवळ एकजण थांबला असून त्याने चरस अमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 2 लाख 68 हजारांचा 36 ग्रॅम चरस मिळून आले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामरिगी खंडणी विरोधी पथकाने पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, उत्तरकर, शितोळे, गाडे, प्रवीण पडवळ यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या