पुणे – खडकीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकाला अटक

प्रातिनिधिक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून 40 वर्षीय आरोपीला खडकी पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेची 13 वयाची मुलगी घराच्या मजल्यावर खेळत होती. त्यावेळी आरोपीने मुलीकडे पाहून अश्लील वर्तन केले. माझ्याकडे ये असे म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्याची माहिती मुलीने आईला दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी दिली. त्यानंतर खडकी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या