पुणे – माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटेसह 13 जणांच्या टोळीवर मोक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

शहरातील काही जणांना दमदाटी करुन मालमत्ता हडप केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह त्यांच्या टोळीतील 13 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत 14 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता रविद्र लक्ष्मण बर्‍हाटे, कथीत पत्रकार देवेंद्र जैन याच्यासह 13 जणांच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत पोलिसांनी कारवाई केली. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी यासंदर्भात सोमवारी आदेश काढले आहेत. शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याची घोषणा केल्यानंतर आठच दिवसात बर्‍हाटे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बर्‍हाटेवर आत्तापर्यंत पुणे शहर, पुणे ग्रामिणमध्ये 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र जैन याच्यासह इतरांवर देखील शहरातील विविध भागात 8 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये फसवणूक करणे, खंडणी, आर्म अ‍ॅक्टसह गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. रवींद्र बर्हाटे शैलेश जगताप, विशाल ढोरे, विनोद ढोरे, अस्लम पठाण, सुजितसिंह, बालाजी लोखंडे, सचिन धीवार, विठ्ठल रेड्डी, परवेश जमादार, देवेंद्र जैन, गणेश आमंदे, नितीन रामदास पवार अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुमंत रंगनाथ देठे (वय 58, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी आणि अनु़ जाती व अनु़ जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.