
खानावळीत जेवण तयार करून डबे पोहोचविण्याच्या आडून बंद घराची रेकी करून साथीदारांच्या मदतीने घरफोडीसह वाहनचोरी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केले. त्याच्याकडून 20 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी असा मिळून 6 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आकाश उमाप रा. वानवडी असे अटक केलेल्याचे नाव आहे.
हडपसरमध्ये जबरी चोरी केलेल्या आचाऱ्याची माहिती पोलीस नाईक नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे यांनी वानवडीतील विकासनगरमध्ये सापळा रचून आकाशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आचारी असल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल केली. मी स्वतः आचारी असून लोकांना डबे पुरविण्याचे काम करतो, तुम्हाला माझ्याबाबत चुकीची माहिती मिळाली आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने जबरी चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, शेखर काटे, नितीन धाडगे, सचिन पवार , ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.
सराईतांच्या मदतीने करीत होता चोरी
आरोपी आकाश वानवडीतील एका खानावळीत जेवण बनविण्याचे काम करीत होता. त्यानंतर डबे पोहोचविण्याच्या आडून तो बंद घरांची रेकी करीत साथीदारांना माहिती देत होता. सराईत जससिंग कालुसिंग जुन्नी उर्पâ पिलू आणि सोमनाथ उर्फ सोम्या गारूळे दोघेही रा. बिराजदारनगर, हडपसर यांच्या मदतीने चोरी, वाहनचोरी, जबरी चोरी करीत होता.

























































