देशी दारूचे दुकान फोडून 70 हजाराच्या दारूची चोरी

425

राहाता शहरातील सरकार मान्य देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार रूपयांची देशी दारू चोरून नेली. कुत्राही मारून टाकला. ही घटना बुधवारी रात्री घडली चितळी रोडवर असलेल्या राहाता पालीकेच्या व्यापारी संकुलामागील भरवस्तीत देशी दारूचे दुकानाचे स्वटर अद्यात चोरट्यांनी तोडून देशी दारूचे 35 बॉक्स 70 हजार रूपये किंमतीचे दारूचे बॉक्स चोरून नेले. यावेळी चोरट्यांवर भुंकनाऱ्या कुत्र्यालाही त्या चोरट्यांनी ठार मारले. विशेष म्हणजे या परीसरात मोठी लोकवस्ती असतानाही ही चोरी झाली.

या प्रकरणी दुकान मालक पांडूरंग भातोडे यांनी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरूण अज्ञात चोरांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहीती कळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पो. नी. भोये यांनी घटनास्थळाची पहानी केली तर दारू बंदी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करन्यात येऊन गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या